शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

मोडता-मोडता सावरले ६0 संसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 00:52 IST

समीर देशपांडे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कुणाची सासू त्रास देते, तर कुणाचा नवरा संशय घेतो. प्रेमविवाह झालाय, परंतु सहा महिन्यांतच पटेनासं झालंय. पोक्तपणे न घेतलेल्या निर्णयामुळे संसारात वादळं उठलेली; परंतु या मोडणाºया संसारांना कोल्हापूर जिल्ह्यात विधि सेवा प्राधिकरणांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा मध्यस्थी केंद्राचा आधार मिळालाय. वर्षभरात एक-दोन नव्हे, तर ...

समीर देशपांडे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कुणाची सासू त्रास देते, तर कुणाचा नवरा संशय घेतो. प्रेमविवाह झालाय, परंतु सहा महिन्यांतच पटेनासं झालंय. पोक्तपणे न घेतलेल्या निर्णयामुळे संसारात वादळं उठलेली; परंतु या मोडणाºया संसारांना कोल्हापूर जिल्ह्यात विधि सेवा प्राधिकरणांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा मध्यस्थी केंद्राचा आधार मिळालाय. वर्षभरात एक-दोन नव्हे, तर तब्बल ६० जोडप्यांचे संसार मोडता-मोडता सावरले आहेत.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रत्येक जिल्ह्यात विधि सेवा प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. विविध न्यायालयांमध्ये प्रलंबित खटले लोकन्यायालयांच्या माध्यमातून मिटविता येतात. मात्र, दाखल न झालेले खटले जिल्हा मध्यस्थी केंद्रामध्ये दाखल करवून घेऊन त्यामधून मार्ग काढता येतो. दिवाणी प्रकरणे, कौटुंबिक वाद, वीज मंडळ, पाणी, करविषयक प्रकरणे यामध्ये दाखल करता येतात.या मध्यस्थी केंद्रांमध्ये १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१७ या कालावधीत दाखल झालेल्या पती-पत्नी वादांच्या प्रकरणांमध्ये ६० जोडप्यांची समजूत काढण्यात मध्यस्थी केंद्राचे समन्वयक उमेशचंद्र मोरे यांना यश आले आहे. यामध्ये अनेक आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह केलेल्यांचाही समावेश आहे. सासू, जाऊ, भावजय, दीर, नांदायला न गेलेली नणंद आणि मुलामुलींचे आई-वडील यांचा संसारातील वाढता हस्तक्षेप हे भांडणातील मुख्य कारण असल्याचे समोर आले आहे.कोल्हापूरच्या या मध्यस्थी केंद्राचे समन्वयक उमेशचंद्र मोरे यांनी अतिशय प्रभावीपणे व कौशल्याने केवळ वर्षभरात ६० जोडप्यांचे संसार सावरले आहेत. यामध्ये सुशिक्षितांची संख्या मोठी आहे.हुकूमनाम्यास आव्हान देता येत नाहीया केंद्रामध्ये तक्रार दाखल झाल्यानंतर ज्यांच्याबद्दल तक्रार आहे त्यांना नोटीस देऊन बोलावून घेतले जाते. पहिल्यांदा ६० दिवस आणि मुदतवाढ घेऊन ९० दिवसांमध्ये सहा ते सात बैठकांमध्ये दोन्ही बाजूंच्या संबंधितांची समजूत काढली जाते. यासाठी तीन वकीलही सहकार्य करतात. संसार तुटण्यामुळे काय होणार, याची जाणीव दोघांनी करून दिली जाते. दोघांचीही समजूत पटली तर त्यांच्याकडून करार करून घेतला जातो. ज्या कारणांवरून भांडणे होतात ती कारणे टाळण्याबाबतचा हा करार असतो. नंतर लोकन्यायालयात संबंधितांच्या सह्या घेतल्या जातात आणि या कराराचा हुकूमनामा होतो. त्याला कुठल्याही न्यायालयात आव्हान देता येत नाही.